नोकरीचे आमिष दाखवून ८७ हजारांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:38 AM2020-11-26T00:38:16+5:302020-11-26T00:39:10+5:30

परदेशात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पिंपळगाव येथील बेरोजगार तरुणाला ८७ हजारांचा गंडा वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

87,000 people were ruined by showing the lure of a job | नोकरीचे आमिष दाखवून ८७ हजारांना गंडविले

नोकरीचे आमिष दाखवून ८७ हजारांना गंडविले

Next

पिंपळगाव बसवंत : परदेशात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पिंपळगाव येथील बेरोजगार तरुणाला ८७ हजारांचा गंडा वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पिंपळगाव येथील ऋषिकेश जाधव या तरुणास परदेशात नोकरी व व्हिसा काढून देण्याचे आमिष १० मे २०१९ रोजी वडाळा मुंबई येथील खासगी कंपनी असलेली किंग्स ऑफ ग्रुपकडून दाखविण्यात आले. त्यानुसार ८७ हजार रुपये ऑनलाइन गूगल पेच्या माध्यमातून हृषिकेश जाधव यांनी कंपनीला दिले. मात्र अद्यापपर्यंत नोकरी न लागल्याने जाधव यांना आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समजताच याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात संबंधित कंपनीचे आशिष थोरात, रा.सायन, कोळीवाडा, वडाळा, मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन करत आहेत.

Web Title: 87,000 people were ruined by showing the lure of a job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.