जिल्ह्यात बाधित ८९; कोरोनामुक्त १९८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:15 IST2022-02-21T01:15:02+5:302022-02-21T01:15:18+5:30
जिल्ह्यात रविवारी (दि.२०) कोरोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकड्यात अर्थात ८९ तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८ होती. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८८८७ पर्यंत गेली आहे.

जिल्ह्यात बाधित ८९; कोरोनामुक्त १९८
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.२०) कोरोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकड्यात अर्थात ८९ तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८ होती. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८८८७ पर्यंत गेली आहे.
जिल्ह्यातील कोरोना प्रलंबित अहवालांच्या संख्येतही घट येऊन ही संख्या अवघी ४८ वर आली आहे. तर कोरोना उपचारार्थी संख्या ७३६ वर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.७४ टक्के झाला असून कोरोनामुक्ततेचा दर ९७.९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.