जिल्ह्याचा ८९.४६ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:33 PM2020-07-16T21:33:54+5:302020-07-17T00:04:46+5:30

नाशिक : बारावीच्या निकालात यावर्षी नाशिक जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. गतवर्षीच्या जिल्ह्यातील ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात तब्बल ५.३ टक्के वाढ झाली असून यावर्षी जिल्ह्यातील ८९.४६ टक्के तर शहरातील ९०.४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

89.46 percent result of the district | जिल्ह्याचा ८९.४६ टक्के निकाल

जिल्ह्याचा ८९.४६ टक्के निकाल

Next

नाशिक : बारावीच्या निकालात यावर्षी नाशिक जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. गतवर्षीच्या जिल्ह्यातील ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात तब्बल ५.३ टक्के वाढ झाली असून यावर्षी जिल्ह्यातील ८९.४६ टक्के तर शहरातील ९०.४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत विज्ञान शाखेने पुन्हा पुढचे पाऊल टाकत निकाल सावरला असून, यावर्षी विज्ञान शाखेचे सर्वाधिक ९७.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर वाणिज्य शाखेचे ९३ टक्के, कला शाखेचे ८० टक्के व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी राज्याप्रमाणे नाशिक जिल्ह्णातही मुलींनीच बाजी मारली असून, जिल्ह्णातील ८६.०५ टक्के मुले, तर ९३.६७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्णातून बारावीच्या परीक्षेला ३८ हजार ९३४ मुले, तर ३१ हजार ४५० असे एकूण ७० हजार ३८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ३८ हजार ७७९ मुले व ३१ हजार ३५० मुली अशा एकूण ७० हजार १२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बारावीची परीक्षा दिली.
त्यातून ३३ हजार ३६८ मुले म्हणजेच ८६.०५ टक्के व २९ हजार ३६६ मुली म्हणजे ९३.६७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, जिल्हाभरातून एकूण ६२ हजार ७३४ विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दि.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत लेखीपरीक्षा, तर प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दि. १ ते १७ फेब्रुवारी २०२० या कालावधीत घेण्यात आली होती. या
उच्चांकी निकाल
गेल्यावर्षी बारावी कला शाखेच्या निकालात २.४८ टक्क्यांनी घसरण झाली होती, तर वाणिज्य शाखेचा १.२२ टक्के व विज्ञान शाखेच्या निकालात सर्वाधिक ३.२५ टक्के घसरण झाली झाली होती. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विज्ञान शाखेच्या निकालात प्रगती होत असताना मागीलवर्षी घसरलेला निकाल यावर्षी पुन्हा सावरला असून, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढचे पाऊल टाकत गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी निकालाची नोंद केली आहे.
शाखा व वर्षनिहाय निकालाची टक्केवारी
शाखा २०१८ २०१९ २०२०
कला ७८.९३ ७६.४५ ८०.३१
वाणिज्य ८९.५० ८८.२८ ९३.०६
विज्ञान ९५.८५ ९२.६० ९७.४८
तालुकानिहाय उत्तीर्ण मुले / मुली
तालुका मुले मुली
चांदवड ८४.९१ ९४.१६
दिंडोरी ७२.८५ ८६.८८
देवळा ८७.९७ ९५.०७
इगतपुरी ८७.२७ ९४.१७
कळवण ९१.६७ ९५.८०
मालेगाव ९१.५५ ९७.०२
नाशिक ८३.३२ ९२.१८
निफाड ८८.५९ ९६.६२
तालुका मुले मुली
नांदगाव ९०.३३ ९४.७२
पेठ ७५.७५ ८१.९७
सुरगाणा ८८.२२ ९०.०४
सटाणा ८३.२९ ९३.२१
सिन्नर ८५.७९ ९६.०२
त्र्यंबकेश्वर ८१.३४ ८९.०३
येवला ८०.१५ ९१.१४
मालेगाव (मनपा) ८६.३० ९४.४२

Web Title: 89.46 percent result of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक