९०० ग्रॅमची बालिका आता झाली ९ किलोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:40 AM2018-10-27T00:40:25+5:302018-10-27T00:41:04+5:30

कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे बालिका सुदृढ झाली आहे.

9 00 gm girl was now 9 kg | ९०० ग्रॅमची बालिका आता झाली ९ किलोची

९०० ग्रॅमची बालिका आता झाली ९ किलोची

Next
ठळक मुद्देकुपोेषणावर मात : मायेचे छत्र हरपलेल्या बालिकेचा अंगणवाडीतच वाढदिवस

नाशिक : कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे बालिका सुदृढ झाली आहे.
विंचूर (ता. निफाड) येथील कोमल गायकवाड असे या बालिकेचे नाव आहे. तिचा पहिला वाढदिवस गेल्या २२ रोजी अंगणवाडीतच धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. कोमल ही आठव्या महिन्यातच जन्माला आली त्यामुळे तिचे वजन अवघे ९०० ग्रॅम होते. आईची तब्येतही चिंताजनक असल्यामुळे आई खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर ४८ तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. कोमल अकरा दिवस जिल्हा रुग्णालयातच होती. या काळात आजी लीलाबाई गायकवाड, अंगणवाडीसेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली.
कोमलच्या आईचा मृत्यूनंतर अंगणवाडीसेविका दररोज तिच्या घरी जाऊन प्रकृतीची काळजी घेत होत्या. अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही तिच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबाला मार्गदर्शन केले. कमी वजन असल्याने कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ. शुभांगी भारती यांनी यासाठी पुढाकार घेतला. पंधरा दिवस ठेवल्यानंतर तिचे वजन ४ किलो ७०० ग्रॅमपर्यंत वाढले. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान
माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी देऊन तपासणी केली.
सर्वांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने कोमल आज एकवर्षाची पूर्ण झाली असून, आज रोजी तिचे वय तब्बल ९ किलो ७०० ग्रॅम इतके झाले आहे. कोमलचा सांभाळ तिची आजी लीलाबाई गायकवाड या करीत असून, कोमलच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून सत्कार
जिल्हा परिषदेच्या समन्वय सभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यासाठी योगदान दिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी अशाच प्रकारे काम करून ग्रामीण भागाची सेवा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: 9 00 gm girl was now 9 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.