९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:42 AM2018-08-30T01:42:25+5:302018-08-30T01:42:43+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे.

 9 4 A salary increase of teachers will be closed forever | ९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद

९४ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमची बंद

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. या शिक्षकांना पुढील प्रक्रियेतूनदेखील बाद करण्यात आले आहे.  शासनाने आॅनलाइन प्रक्रियेद्वारे बदलीप्रक्रिया पूर्ण केली मात्र यामध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग एक व दोनमध्ये खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविल्या आहेत अथवा बदलीतून सूट घेतली अशा १९४ शिक्षकांची सुनावणी गिते यांनी घेतली होती. चौकशीत  खोटी माहिती भरणाºया ९४ शिक्षकांना डॉ. नरेश गिते यांनी दणका दिला आहे.  एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. दोषी ठरल्यामुळे यापुढे त्यांना बदलीसाठी विकल्प भरता येणार नसून त्यांना अवघड क्षेत्रात काम करावे लागणार आहे.  शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्ह्णातील १९४ शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेतली होती. यामध्ये प्रामुख्याने चुकीचे अंतर, खोटे वैद्यकीय कारण, पती-पत्नी एकत्रीकरण याबाबत खोटी माहिती भरल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्व १९४ शिक्षकांच्या सुनावण्या घेतल्या होत्या. या शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सतत्येविषयी तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहण्यात आल्या होत्या. यापैकी १०० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यापैकी ९४ शिक्षकांचा खुलासा अमान्य करण्यात आला असून त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.
आणखी १५ शिक्षक रडारवर
या शिक्षकांची दोषी ठरल्यामुळे पुढील बदली प्रक्रि येत त्यांना विकल्प राहणार नसून अवघड भागात त्यांची बदली होणार आहे. अशा शिक्षकांचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ९४ व्यतिरिक्त अजून १५ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यावर त्यांचेवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
कारवाईवर मात्र नाराजी कायम
शिक्षकबदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी लढणाºया शिक्षकांच्या कृती समितीकडून मात्र सदर कारवाई परिणामकारक नसल्याचे म्हटले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण शासन यंत्रणेची दिशाभूल करण्याबरोबरच अशा शिक्षकांमुळे अन्य प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाल्याने गिते यांच्या कारवाईने न्याय मिळत नसल्याच्ची भावना कृती समितीची आहे.

Web Title:  9 4 A salary increase of teachers will be closed forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.