शिक्षकांसह विभागात ९४५ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:20 AM2017-09-19T00:20:12+5:302017-09-19T00:20:28+5:30
नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी नसल्याने या शाळाखोल्यांचे काम रखडल्याचेही बैठकीत समोर आले.
नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी नसल्याने या शाळाखोल्यांचे काम रखडल्याचेही बैठकीत समोर आले.
शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला असता, त्यात ९४५ जागा रिक्त असल्याचे आढाव्यात उघड झाले. पाठ्यपुस्तक व शालेय गणवेशाची माहिती घेण्यात आली. त्यात ९० टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाच्या रक्कमेचे वाटप झाले आहे. परंतु काही ठिकाणी बॅँकांच्या अडचणींमुळे अनुदान वितरीत करणे अडचणीचे झालेले आहे. या अडचणी तत्काळ दूर करून १०० टक्के गणवेश वाटप करून अनुदानदेखील १०० टक्के वितरीत करण्याबाबत सभापती यतिन पगार यांनी दिल्या. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १७० शाळाखोल्यांचे बांधकाम सुरू आहे, तर २२६ शाळाखोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यांचे बांधकाम रखडल्याचे बैठकीत उघड झाले. निर्लेखन प्रस्तावांमधील त्रुटी दूर करून मुख्याध्यापकांनी प्रस्ताव मान्यतेसाठी तत्काळ सादर करावेत, अशा सूचना यतिन पगार यांनी दिल्या. शालेय पोषण आहाराच्या रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने बचतगटांचे मानधन देणे बाकी होते. त्या बचतगटांना राष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नव्याने ९२ शाळा बांधकामांचे निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. बैठकीस सिद्धार्थ वनारसे, नूतन अहेर, आशाताई जगताप, राजेंद्र सोनवणे, पंडित अहेर आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठरावराष्टÑीय व राज्य स्तरावर शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले. त्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला.खेळाडूंना आवाहन
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचे आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी तसेच जिल्हास्तरावर आपली नावे नोंदवावीत असे आवाहन सभापती यतिन पगार यांनी केले आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन देण्यासाठी क्रीडा साहित्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.