जिल्हा रुग्णालयाने वापरला ९ कोटी ८६ लाखांचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:39 PM2020-06-20T22:39:07+5:302020-06-20T22:41:40+5:30
नाशिक : संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराचे सर्वात प्रमुख केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीने गत तीन महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमदार निधीतून नऊ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी आरोग्याशी संबंधित बाबींवर खर्च केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

आरोग्य विभागासाठी एकूण ११ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, उर्वरित निधी अद्याप मिळणे प्रस्तावित आहे. नाशिककरांच्या आरोग्यासाठी खर्च झालेल्या निधीतून २३ व्हेंटिलेटर्स, १४ सी पॅप मशीन, ३९ पोर्टेबल एक्स-रे मशीन, ४९० थर्मल स्कॅनर, ५०० पल्स आॅक्स फिंगर प्रोब, ६३ मल्टिपोरा मॉनिटर, ६० इसीजी मशीन, एन-९५ मास्क ४० हजार, पीपीई किट ३५ हजार, व्हीटीएम किट ४५ हजार, आॅक्सिजन सिलिंडर ४१४, टॅब हायड्रॉक्सी क्लोरोक्विन ५० हजार, टॅमी फ्ल्यू ४० हजार, ट्रिपल लेअर फेस मास्क २ लाख ५० हजार, क्लोथ मास्क ५० हजार, रबर ग्लोव्हज ३ लाख ५० हजार या सर्व साहित्यांची आणि उपकरणांची खरेदी करण्यात आली.
त्याशिवाय जिल्ह्यातील सात आमदारांनी मिळून प्रत्येकी १० ते १५ लाख रुपयांचे आमदार निधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील ७७ लाख रुपयांचा निधी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला असून, त्या निधीतूनही आरोग्य विषयक साहित्याची खरेदी केली. आवश्यक भासल्यास अधिक निधीजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या आणि उपचार घेऊन घरी परतलेल्या कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समिती आणि आरोग्य विभागाच्या वतीने अधिक निधी आणि साहित्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे.