येवल्यातील ९ पॉझीटीव्ह; एक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:49 PM2020-10-18T21:49:58+5:302020-10-19T00:19:26+5:30
येवला : प्रलंबीत ३७ अहवालात शहरासह तालुक्यातील ९ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर नाशिक रूग्णालयातून एक बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतला आहे.
येवला : प्रलंबीत ३७ अहवालात शहरासह तालुक्यातील ९ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर नाशिक रूग्णालयातून एक बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतला आहे.
बाधितांमध्ये शहरातील पटेल कॉलनीतील २७ वर्षीय पुरूष, मेनरोड भागातील ६० वर्षीय पुरूष, रेल्व स्टेशन कॉलनीतील ७० वर्षीय पुरूष, तालुक्यातील बदापूर येथील ५४ वषीय पुरूष, २३ वर्षीय महिला, डोंगरगाव येथील ६५ वर्षीय महिला, पारेगाव येथील १९ वर्षीय पुरूष, शिरसगाव येथील ५४ वर्षीय महिला, नगरसुल येथील ३२ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ९३७ झाली असून आजपर्यंत ८३२ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ५५ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.