नाशकात चार महिन्यात ९ हजार ११२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:09 PM2021-06-09T23:09:36+5:302021-06-10T01:02:23+5:30
नाशिक- शहरात चार महिन्यात कोरोनामुळे एक हजार रूग्णांचा मृत्यू झाल्याची महापालिकेकडे नोंद असली तरी,जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात तब्बल नऊ हजार ११२ मृ्त्यु झाल्याची धक्कादायक बाब चर्चेत आली आहे. मात्र, महापालिकेने त्याचा इन्कार केला असून मृत्यु हे कोविडसह विविध आजाराचे आहेत. त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध तालुक्यांसह उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील मृतांच्या आकड्यांचाही यात समावेश आहे असा दावा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी केला आहे.

नाशिक शहरातील कोरोना बाधीतांच्या आकडेवारीविषयी प्रचंड घोळ असल्याचे प्रकार यापूर्वीही उघड झाले आहेत. आता राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन जानेवारी ते एप्रिल या चार तीन महिन्यात किती रूग्णांचे मृत्यू झाले,याच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. त्यात
जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधी मध्ये नऊ हजार ११२ मृत्यु झाल्याची नोंद आहे. त्यात सर्वाधिक मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे वृत्त आहे यात ५ हजार ५५८ पुरुष तर ३ हजार ५५४ महिलांचा समावेश आहे. तर एप्रील महिन्यात सर्वाधिक ४ हजार १९५ रूणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महापालिकेने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना यात केवळ कोरोनाबळींचाच नव्हे तर अन्य आजारानेही नाशिकमध्ये मृत्यू झालेल्या उत्तर महाराष्ट्र आणि जिल्ह्य बाह्य रूग्णांचा समावेश आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी नमूद केले आहे.