ठेंगोड्यात माफियांकडून ९० ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:38 PM2020-06-24T22:38:29+5:302020-06-24T22:40:47+5:30
सटाणा : येथील महसूल यंत्रणा कोरोनासंबंधित नियोजनात व्यस्त असल्याची संधी साधून माफियांनी वाळू तस्करी सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. ठेंगोडा येथील सूतगिरणीच्या जागेवरील वाळू साठ्यावर छापा टाकून सुमारे ९० ब्रास वाळू जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या धडक कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून सूतगिरणीच्या आवारात साठा करण्यात येत होता व अनधिकृत वाळू विक्र ी केली जात असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. तहसीलदारांच्या पथकाने ठेंगोडा येथील सूतगिरणीच्या काटेरी झुडपात छापा टाकला असता तब्बल ९० ब्रास वाळूचा साठा केल्याचे आढळून आले. पथकाने तत्काळ पंचनामा केला. त्यानंतर जप्त केलेली वाळू पोलीस कवायत मैदानावर आणली आली आहे.