गतवर्षात वाचविली ३९ कोटींची मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:19 AM2020-01-18T00:19:42+5:302020-01-18T01:13:23+5:30
गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.
मालेगाव : गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे.
वाढती झोडपट्टी, अरुंद रस्ते, अतिक्रमणे, अपुऱ्या सुविधा यावर मात करीत येथील अग्निशमन दलाच्या जवानांचा संघर्ष सुरू आहे. मालेगावच्या तीन अग्निशमन दल केंद्रात ३० जवान कार्यरत आहेत, तर ७ बंब सज्ज आहेत. अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागातील रस्ते तीन ते चार फुटांचे आहेत. या भागात आगीची घटना घडल्यास या भागात बंब पोहोचणे अवघड होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना काहीवेळा पाचशे फुटांवरून पाण्याचा मारा करावा लागतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २२५ आगीच्या घटना घडल्या आहेत. बचाव कार्य करताना अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. मनपा आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशमन दलप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ३९ कोटी ६४ लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कामात अनेक अडचणी येतात. सर्व अडचणींवर मात करत जवान आगीच्या घटना रोखत आहेत.
२२ जणांचा मृत्यू
पूर तसेच आगीच्या घटनेतून दोन व्यक्तींना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. यासह पाच जनांवरांना जीवदान मिळाले आहे. गेल्या वर्षी २२ व्यक्तींचा नैसर्गिक आपत्ती व आगीच्या घटनेत बळी गेला आहे. जवानांनी ३७ ठिकाणच्या आगींवर नियंत्रण मिळविले.