मका पिकाचे ९० टक्के क्षेत्र लष्करी अळीने बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:48 PM2020-07-02T16:48:50+5:302020-07-02T16:49:32+5:30
पाटोदा : नगदी पिक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला, मका पिक लागवड क्षेत्रात वाढ झाली. मात्र, त्यावर मोठया प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अमेरिकन लष्करी अळीचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, वारेमाप खर्च करूनही पिकाची शाश्वती राहिली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षी येवला तालुक्यात सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झालेली आहे. यातील सुमारे ८० ते ९० टक्के क्षेत्र अमेरिकन लष्करी अळीने बाधित झाले आहेत. अळी नियंत्रणासाठी विविध उपाय योजना करीत असतांना महागडी औषध फवारणीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकºयांची अवस्था रोगापेक्षा इलाज भयंकर अशी झाली आहे.
मका पिकातून पैसा व पशुधन जगविण्यासाठी चारा उपलब्ध होत असल्याने शेतकरी पशुधन जगवण्यासाठी मक्याचे पीक घेतात. मात्र, अमेरिकन लष्करी अळीने जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
सुमारे पाच एकर क्षेत्रावर मका पिकाची लागवड केली आहे. लागवडी नंतर आठ दहा दिवसानंतर संपूर्ण पिक हे या अमेरिकन लष्करी अळीने बाधित झाले आहे. अळी नियंत्रणात आणण्यासाठी दोन वेळेस औषधे फवारणी केली त्यासाठी वीस हजार रु पये खर्च आला. मजुरांमार्फत प्रत्येक झाडाच्या पोंग्यात बाटलीने औषध टाकले जात आहे. सध्या अळी काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी पुढील कालावधीत पिक हातात येईल कि नाही याची चिंता वाढली आहे.
- मच्छिंद्र कदम, शेतकरी, निळखेडे.