जलालपूर, महादेवपूरला ९० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:03 AM2018-05-28T00:03:19+5:302018-05-28T00:03:19+5:30
नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गंगापूर : नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार (दि.२७) सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रि या सुरुवात झाली. दोन्ही ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व सदस्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. जलालपूरला तीन केंद्रांवरती तीन बूथ लावण्यात आले होते. सकाळपासूनच नागरिक मतदान करण्यासाठी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडताना दिसत होते. जलालपूर मध्ये १०१६ मतदारांपैकी ८५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महादेवपूरमध्ये ११०१ मतदारांपैकी १०१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला-पुरु षांच्या वेगवेगळ्या रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. नागरिकांना निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतदान कसे करावे याबाबत माहिती दिली जात होती. जलालपूरमधील वॉर्ड नंबर दोनमधून रमेश डंबाळे आणि संगीत नेहरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काही मतदार आजारी असल्याने त्यांना चालता येत नसतानाही त्यांना उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून चारचाकी वाहनांतून आणून ते मतदान केंद्रापर्यंत कडेवर घेऊन मतदानाचा हक्क बजावला. या मतदानप्रक्रि या शांततेत पार पाडावी यासाठी नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठुबे, एपीआय नेहते यांच्या नियंत्रणाखाली पोलीस फौजफाटा यांनी तसेच गावातील पोलीसपाटील पप्पू मोहिते, निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी काळे, तलाठी डी. सी. पाबळे यांनी कामकाज बघितले व निवडणूक प्रक्रि या शांततेत पार पडण्यास मदत केली.