जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:34 AM2020-02-14T01:34:48+5:302020-02-14T01:36:07+5:30
राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे.
नाशिक : राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या पडताळणी कार्यक्रमाची मुदत सुरुवातीला २० डिसेंबर २०१९ पर्यंत होती. परंतु बीएलओंकडून अपेक्षित कामे होऊ न शकल्याने मतदार कर्मचाऱ्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी (दि.१३) सायंकाळपर्यंत जिल्ह्णातील पंधरा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ कर्मचाऱ्यांकडून पडताळणी झालेल्या मतदारांची माहिती घेतली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार ९३ टक्के पडताळणी पूर्ण करण्यात आली असून, शुक्रवारी जाहीर करण्यात येणाºया आकडेवारीनंतर यात आणखी एक ते दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्णातील १५ मतदारसंघांत ४५ लाख ६२ हजार ५७१ मतदारांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखेने हातात घेतले आहे. पडताळणीची मुदत संपुष्टात येत असतानाही जिल्ह्णातील पाच मतदारसंघ रेडझोनमध्येच असल्याने या पाचही ठिकाणी शेवटच्या दिवशी अधिक प्रभावीपणे मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, एकदा या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. अंतिम दिवसाचा अहवाल हाती आल्यानंतर ज्या मतदारसंघातील पडताळणीचे काम कमी झालेले आहे अशा ठिकाणी काम करणाºया बीएलओंचे मूल्यमापन केले जाणार आहे.
जे कर्मचारी मोहिमेत अपेक्षितप्रमाणे कामे करू शकली नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. रेडझोनमध्ये असलेल्या पाच मतदारसंघांतील पडताळणीची टक्केवारी पाहिली तर त्यामध्ये एखादा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांवर कारवाईची टांगती तलवार लटकणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.