सिन्नरहून ९०४ कामगारांची बिहारला घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:15 PM2020-05-21T21:15:33+5:302020-05-21T23:26:57+5:30

सिन्नर : लॉकडाउनमुळे रोजगार हिरवल्यामुळे माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून तब्बल ९०४ बिहारी कामगारांनी बुधवारी सिन्नरला अलविदा केले. सिन्नर तहसीलकडून १९ बसच्या माध्यमातून या बिहारी कामगारांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. दुपारी २ वाजता विषेश रेल्वेने हे परप्रांतीय बिहारकडे रवाना झाले.

 904 workers return home from Sinnar to Bihar | सिन्नरहून ९०४ कामगारांची बिहारला घरवापसी

सिन्नरहून ९०४ कामगारांची बिहारला घरवापसी

Next

सिन्नर : लॉकडाउनमुळे रोजगार हिरवल्यामुळे माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून तब्बल ९०४ बिहारी कामगारांनी बुधवारी सिन्नरला अलविदा केले. सिन्नर तहसीलकडून १९ बसच्या माध्यमातून या बिहारी कामगारांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. दुपारी २ वाजता विषेश रेल्वेने हे परप्रांतीय बिहारकडे रवाना झाले.
गावाकडे परतण्यासाठी या मजुरांची यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात आली होती. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना १९ बसच्या माध्यमातून नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. पाणी, बिस्कीट पुडे, जेवणाचे पॉकेट देऊन या कामगारांची रवानगी करण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, डॉ. मोहन बच्छाव, संजय गाडे, माणिक गाडे, आकाश हांडे, स्वरूप गोराणे उपस्थित होते.
-----------------------------
परप्रांतीयांनी सोडले सिन्नर
४यापूर्वी मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून उत्तर प्रदेश येथे विशेष रेल्वेने १४८८, मध्य प्रदेशात ५३९ आणि आता बिहार येथे ९०४ अशा एकूण २९३१ परप्रांतीयांची त्यांच्या मुळगावी सुरक्षित पाठवणी केली. प्रशासनाच्या दप्तरी तीन हजार कामगारांची नोंद झाली असली तरी अनेकांनी नोंदणी न करताच आपापल्या परीने मुळगाव गाठले आहे. त्यामुळे सिन्नरमधून सुमारे चार हजार परप्रांतीय गावाकडे परतल्याचा अंदाज आहे.

Web Title:  904 workers return home from Sinnar to Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक