पहिला डोस घेणाऱ्यांचे नाशिक शहरात ९२ टक्के प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:45 AM2021-12-25T01:45:31+5:302021-12-25T01:45:48+5:30
ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी गर्दी होत असून त्यामुळेच महापालिकेने चार ठिकाणी चोवीस तास लसीकरणाची देखील व्यवस्था केली आहे.
ref='https://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक- ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी गर्दी होत असून त्यामुळेच महापालिकेने चार ठिकाणी चोवीस तास लसीकरणाची देखील व्यवस्था केली आहे. जानेवारी महिन्यात केारेाना प्रतिबंधक लसीकरण उपलब्ध झाल्यानंतर सुरूवातीला केारोना योध्दे आणि फ्रंड लाईन वर्कर्स यांनाच ती देण्यात आली. ४५ वर्षावरील आणि तेही व्याधीग्रस्त नागरीकांना लस देण्याचे सुरवातीला ठरवण्यात आले. त्यानंतर आता १८ वर्षावरील सर्वांनाच लस दिली जात आहे. कोरेानाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरीकांनी रांगा लाऊन डाेस घेण्याची तयारी केेली मात्र, डोसच उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत हेाती. ऑक्टोबरच्या सुमारास मुबलक डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाला प्रतिसाद वाढला. त्यानंतर आता बऱ्यापैकी निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा कोरोना संकट ओढोवणार नाही अशा आर्विभार्वत नागरीक असले तरी ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा लसीकरणाला प्रतिसाद वाढला. पुन्हा एकदा रांगा लावून लसीकरण करून घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने लसीकरण वाढवण्यासाठी जेारदार मोहिम सुरू असून ९२ टक्के नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ६२ टक्के नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे.सध्या नाशिक शहरात १३५ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था असून पहिल्या डोस पेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पहिला डाेस जेमतेम एक हजार नागरीकांना दिला जात असून पाच ते सहा हजार नागरीकांना रोज दुसरा डोस दिला जात आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. इन्फो...असे आहे लसीकरण... पहिला डोस- ९,९५,७०९दुसरा डोस- ७,०१,२१२ एकुण- १६, ९६,९२१