देशातील ९३टक्के लोकांचा वैद्यकिय क्षेत्रावर विश्वास नाही : डॉ. अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 06:13 PM2018-02-25T18:13:44+5:302018-02-25T18:13:44+5:30

राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आला.

93% of people do not believe in medical sector: Dr. Abhay Bang | देशातील ९३टक्के लोकांचा वैद्यकिय क्षेत्रावर विश्वास नाही : डॉ. अभय बंग

देशातील ९३टक्के लोकांचा वैद्यकिय क्षेत्रावर विश्वास नाही : डॉ. अभय बंग

Next
ठळक मुद्देपालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार वैद्यकीय व्यवसायाची स्थिती रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक सावानाच्या कार्यक्षम आमदार पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली

नाशिक : देशातील आजची वैद्यकीय व्यवसायाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, ९३ टक्के लोकांचा रुग्णालय, डॉक्टरांवर विश्वास राहिला नाही, ही भविष्याच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याची टीका डॉ. अभय बंग यांनी केली.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बंग प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
मागील पंधरा वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने कार्यक्षम याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्यासह सभागृहात महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. आदी मान्यवर उपस्थित होते. बंग यांच्या हस्ते शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह महाजन यांना प्रदान करण्यात आले. यंदा निवड मंडळाच्या वतीने या पुरस्कारासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची निवड केली.
यावेळी बंग म्हणाले, आजच्या वैद्यकीय व्यवसायाची स्थिती बघता रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक ठरत आहे. देशातील केवळ सात टक्के लोकांचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास टिकून आहे ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. देशाला डॉक्टरांची मोठी गरज आहे. देशाच्या आरोग्यविषयक आर्थिक तरतुदीच्या दुप्पट तरतूद अमेरिकेने तेथील श्वानांच्या आरोग्यासाठी केली आहे, असे ते म्हणाले. जेथे गरज आहे तेथे डॉक्टरांची स्पर्धा दिसत नाही व जेथे गरज नाही तेथे स्पर्धा असते, ही शोकांतिका आहे. वैद्यकीय क्षेत्राविषयी सर्र्वसामान्यांच्या मनात असलेला संशय व भीती जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व रुग्णामध्ये निरोधी संबंध निर्माण होणार नाही, असे बंग यावेळी म्हणाले.

पुरस्काराने जबाबदारी वाढली
सावानाच्या कार्यक्षम आमदार पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे व यापुढे अधिक दमदारपणे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार आहे.


- गिरीश महाजन, पालक मंत्री

Web Title: 93% of people do not believe in medical sector: Dr. Abhay Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.