नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित; ७९६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:01 PM2020-09-10T16:01:42+5:302020-09-10T16:08:56+5:30

नाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले. त्यापैकी पाच पोलीस हे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहे.

933 police corona blocked in Nashik area; 796 corona free | नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित; ७९६ कोरोनामुक्त

नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित; ७९६ कोरोनामुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण दलाने गमावले पाच योद्धेनाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस मृत्युमुखी पडले

नाशिक : मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणा-या नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ७९६ पोलिसांसह १९ होमगार्ड आणि राज्यराखीव दलाच्या बाधित सर्व जवानांनी कोरोनावर यशस्वी विजय मिळविला. दुर्दैवाने परिक्षेत्रात १० कोरोनायोद्धा पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिद घेत सेवा बजावणा-या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी वर्गालाही कोरोनाला सामोरे जावे लागत आहे. परिक्षेत्रातील एकूण पाच जिल्ह्यांत सेवा बजावत असताना कोरोनाची पोलिसांना लागण झाली. सर्वाधिक ३३३ पोलीस नाशिक ग्रामीणमधील मालेगावात बंदोबस्तावर असताना बाधित झाले. त्यापैकी ३०६ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, २७ पोलीस उपचारार्थ दाखल आहेत. दुर्दैवाने पाच पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलालाही कोरोनाचा जबर फटका बसला. एकूण २७७ पोलीस बाधित झाले. त्यापैकी २२४ पोलिसांनी कोरोनावर मात केली, तर ५३ पोलीस उपचार घेत आहेत. याच जिल्ह्यात १६ होमगार्ड आणि ७५ राज्य राखीव दलाचे जवानही कोरोनाग्रस्त झाले होते. त्यापैकी दोन होमगार्डचा अपवाद वगळता सर्व जवान कोरोनामुक्त झाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा २३६ पोलिसांसह एक जवान व पाच होमगार्ड कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी २०४ पोलीस व सर्व होमगार्ड कोरोनामुक्त झाले, तर तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात ४८ पोलीस बाधित झाले त्यापैकी ४० पोलीस कोरोनामुक्त झाले, तर नंदुरबार जिल्ह्यात ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी २२ पोलिसांनी कोरोनाला हरविले. सुदैवाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित पोलिसाचा आतापर्यंत मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत परिक्षेत्रात कोरोनाबाधित १२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि दोन होमगार्ड यांच्यावर उपचार सुरू आहे.

नाशिक ग्रामीण दलाने गमावले पाच योद्धे
नाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले. त्यापैकी पाच पोलीस हे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहे. ग्रामीण पोलिसांनी लॉकडाऊन काळात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात दिवसरात्र चोख बंदोबस्त देत मालेगावाला कोरोनामुक्त करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मालेगावकरांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा रस्त्यावर २४ तास कडापहारा होता.

Web Title: 933 police corona blocked in Nashik area; 796 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.