२७ मतदान केंद्रांसाठी ९४ बूथ तयार
By Suyog.joshi | Published: May 19, 2024 06:23 PM2024-05-19T18:23:55+5:302024-05-19T18:24:41+5:30
इंदिरानगर पोलिसांनी मतदान केंद्राचा व बूथचा ताबा घेतला आहे.
इंदिरानगर, नाशिक (संजय शहाणे) इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक ते पाथर्डी गाव दरम्यान असलेल्या २७ मतदान केंद्र व ९४ बूथ या ठिकाणी मतदान अधिकारी व कर्मचारी मतदान पेट्यासह दाखल झाले आहेत. इंदिरानगर पोलिसांनी मतदान केंद्राचा व बूथचा ताबा घेतला आहे.
जॉगिंग ट्रॅक ते पाथर्डी गाव दरम्यान इंदिरानगर परिसरासाठी विवेकानंद सभागृह, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, सुखदेव प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्वात्मक वाचनालय, सावरकर हॉल, अजय मित्र मंडळ हॉल, स्वामी विवेकानंद विद्यालय, मोदकेश्वर समाज मंदिर, केबीएच विद्यालय वडाळा गाव, मनपा शाळा क्रमांक ८३ व ८२ वडाळा गाव, डे केअर सेंटर शाळा रामनगर, केंब्रिज इंग्लिश स्कूल वडाळा पाथर्डी रस्ता, सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगर, जाजू विद्यालय राणे नगर, गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल, लोकमान्य वाचनालय उद्यम रायगड सोसायटी राजीवनगर, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी फाटा, आर के फिटनेस स्कूल पाथर्डी, मनपा शाळा क्रमांक ८९ प्रशांतनगर, सामाजिक सभागृह पाथर्डी फाटा, धनलक्ष्मी शाळा पाथर्डी फाटा, मनपा शाळा क्रमांक ८६ व ८७ पाथर्डी गाव, असे एकूण २७ मतदान केंद्रे आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून बंदोबस्तासाठी १७ पोलीस अधिकारी, १२७ कर्मचारी व ८० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.