प्रभाग १२ ड साठी ३९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:24 PM2020-01-09T23:24:37+5:302020-01-09T23:25:10+5:30

महानगरपालिकेच्या प्रभाग १२ ड च्या पोटनिवडणुकीत ३८.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. मतदारांच्या औदासीन्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वाधिक ६२.८५, तर ३१ वर सर्वात कमी ५.५७ टक्के म्हणजे ७७२ पैकी अवघ्या ४३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

94% voting for ward 3d | प्रभाग १२ ड साठी ३९ टक्के मतदान

मालेगावी प्रभाग क्रमांक १२ ड मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महिला मतदारांनी मतदानासाठी लावलेली रांग.

googlenewsNext
ठळक मुद्देपोटनिवडणूक : मतदान शांततेत

मालेगाव मध्य : महानगरपालिकेच्या प्रभाग १२ ड च्या पोटनिवडणुकीत ३८.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. मतदारांच्या औदासीन्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वाधिक ६२.८५, तर ३१ वर सर्वात कमी ५.५७ टक्के म्हणजे ७७२ पैकी अवघ्या ४३ मतदारांनी आपला हक्क बजावला.
जनता दल गटनेते बुलंद एकबाल निहाल अहमद यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी आज सकाळी साडेसात ते साडेपाचदरम्यान मतदान घेण्यात आले. शहरातील सहा शाळांमधील मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. पाच उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही जनता दलाचे मोहंमद मुस्तकीम डिग्नीटी व काँग्रेसचे मोहंमद फारूख कुरैशी यांच्यात होती. दोन दिवसांपासून शहरात थंडीचा कमी असलेला जोर आज पुन्हा वाढल्याने सकाळपासून मतदान संथगतीने सुरू होते. दुपारी दोनपर्यंत अवघे १७ टक्के मतदान झाले होते. दुपारी अडीच वाजेनंतर महिला मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडल्याने दुपारनंतर काही ठिकाणी महिलांच्या रांगा दिसून आल्या. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत भर पडली. उद्या सकाळी  ९ वाजता महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. आज पार पडलेल्या पोटनिवडणुकीतही मतदार याद्यांमधील घोळ समोर आला. अनेक मतदारांच्या नावामध्ये चुका, महिलांचे फोटो व पुरुषांचे नाव तर काही नावांसमोर फोटोच नसल्याने मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. त्यामुळेही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे उमेदवारांकडून आरोप करण्यात आला. निवडणुकीदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

मतदारांनी दाखविला निरुत्साह
प्रभाग क्र. १२ ड मध्ये १२ हजार १०६ महिला, तर १२ हजार ४०८ पुरुष असे २४ हजार ५१४ मतदार आहेत; मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ४ हजार ५७९ स्रियांनी तर चार हजार ९८० पुरुष असे केवळ ९ हजार ५५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का या प्रभागात घसरला.

Web Title: 94% voting for ward 3d

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.