बाबासाहेबांच्या त्र्यंबकेश्वर भेटीची ९४ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:11 AM2022-01-18T00:11:21+5:302022-01-18T00:19:53+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आणि शैव-वैष्णव यांचे श्रद्धास्थान आहे. याच त्र्यंबकेश्वरला भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब ...

94 years of Babasaheb's visit to Trimbakeshwar | बाबासाहेबांच्या त्र्यंबकेश्वर भेटीची ९४ वर्षे

बाबासाहेबांच्या त्र्यंबकेश्वर भेटीची ९४ वर्षे

Next
ठळक मुद्दे स्मृतींना उजाळा : स्मारक उभारण्याची आंबेडकरप्रेमींची मागणी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आणि शैव-वैष्णव यांचे श्रद्धास्थान आहे. याच त्र्यंबकेश्वरला भारतीय राज्यघटना शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श लाभला आहे. बाबासाहेबांनी १८ जानेवारी १९२८ रोजी त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती. या भेटीला मंगळवारी (दि. १८) बरोबर ९४ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या भेटीचे स्मरण त्र्यंबककरांकडून केले जाते. मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत निवृत्तीनाथांनी जेथे ८०० वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली, त्याच ठिकाणी जातीय भेदाभेदाच्या अंधकारात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला दिव्यदृष्टी दाखविण्यासाठी बाबासाहेब आले होते. १८ जानेवारी १९२८ रोजी संत निवृत्तीनाथांची यात्रा सुरू होती. दुपारच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिराच्या अगदी समोर संत चोखोबा मंदिर आहे. तेथील भूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र पावलांचा स्पर्श झाला आणि ती भूमी पावन झाली. आज त्या पावनस्मृती जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेबांना पाहण्यासाठी यावेळी गर्दी उसळली होती. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीसाठी आपण काही देणे-लागतो, ही भावना लोकांमध्ये जागृत झाली. ह्यबहिष्कृत भारतह्ण या वृत्तपत्रात याची नोंद आहे. त्यावेळी लोकांनी आठ आण्यापासून, १ रुपया, पंचवीस रुपये, पन्नास रुपये अशी मदत केली होती. एकूण २०३ रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी मदत गोळा झाली होती. या सभेसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे उपस्थित होते. यावेळेस ब्राह्मण व मराठी नेत्यांनी या सभेस उपस्थित राहून अनिष्ट रुढी, परंपरांना विरोध केला होता.


कोनशिलेतून इतिहास जागृत

या ऐतिहासिक घटनेला ९४ वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी आजही त्र्यंबकेश्वर वासीयांच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सन २०२० मध्ये आंबेडकर पुतळ्याजवळ ऐतिहासिक कोनशिलेचे अनावरण केलेले आहे. या दिवसाची महती आणि माहिती येथे आलेल्या प्रत्येक माणसाला व्हावी या हेतूने संविधान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून ही कोनशिला उभारण्यात आलेली आहे.

Web Title: 94 years of Babasaheb's visit to Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.