कुरियर कंपनीचे ऑफिस फोडून येवल्यात ९५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:47 AM2022-01-20T00:47:09+5:302022-01-20T00:47:09+5:30

येवला : शहरातील इकॉम एक्स्प्रेस प्रा. लि. या कुरियर कंपनीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ९५ हजार रुपये चोरून नेले आहे.

95,000 stolen after breaking into courier company's office | कुरियर कंपनीचे ऑफिस फोडून येवल्यात ९५ हजारांची चोरी

कुरियर कंपनीचे ऑफिस फोडून येवल्यात ९५ हजारांची चोरी

Next
ठळक मुद्देसदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली

येवला : शहरातील इकॉम एक्स्प्रेस प्रा. लि. या कुरियर कंपनीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ९५ हजार रुपये चोरून नेले आहे.

शहरातील विठ्ठलनगर भागात इकॉम एक्स्प्रेस प्रा. लि. या कुरियर कंपनीचे ऑफिस आहे. चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिसमधील लॉकर तोडून लॉकरमधील ९५ हजार ३३२ रुपये रोख रक्कम चोरून नेली.

सदर घटना रविवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास घडली. कंपनीचे पर्यवेक्षक गणेश सीताराम राजोळे, रा. उंदीवाडी, ता. येवला यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दाखल केल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे हे करत आहेत.

Web Title: 95,000 stolen after breaking into courier company's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.