जिल्ह्यात ९७२ नवे रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 02:13 AM2020-09-03T02:13:46+5:302020-09-03T02:14:11+5:30
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी (दि. २) ९७२ नवे रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
मागील आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे आकडेवारीवरून दिसते. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २८२ संशयित रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रु ग्ण शहरातील आहेत. एकूणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढती रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ८९४ इतका झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३९२ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. नाशिककरांना खबरदारी घेत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.
एक हजार ३८७ अहवाल प्रलंबित
सध्या जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.