जिल्ह्यात ९८ टक्के पर्जन्यमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:17 AM2017-08-30T01:17:05+5:302017-08-30T01:17:10+5:30
यंदा पाऊस आॅगस्ट अखेरीसच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून, गेल्या चार दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे ९८ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्के पर्जन्यवृष्टी झाली असून, तो विक्रम मानला जात आहे.
नाशिक : यंदा पाऊस आॅगस्ट अखेरीसच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून, गेल्या चार दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे ९८ टक्के पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्के पर्जन्यवृष्टी झाली असून, तो विक्रम मानला जात आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ३७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, हवामान खात्याने येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनातर्फे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सलगच्या पावसामुळे आॅगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ७३ टक्के इतका पाऊस मंगळवारपर्यंत नोंदविला गेला. आॅगस्ट महिन्यात आजवर ४२२८ मिलिमीटर पावसाची नोंद असून, यंदा ३११४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ७३ इतकी असून, त्यातही सुरुवातीच्या पंधरा दिवसांत पावसाने दडी मारली होती, त्यामुळे अवघ्या दहा दिवसातच सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आॅगस्टअखेर जिल्ह्यात ८६ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र हेच प्रमाण ९८ टक्के इतके असल्यामुळे गिरणा वगळता अन्य धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्णातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, नांदगाव व सुरगाणा या सहा तालुक्यांमध्ये शंभर टक्क्याहून अधिक पाऊस नोंदविला गेला असून, याचवेळी मात्र मालेगाव व देवळा या दोन तालुक्यांमध्ये अनुक्रमे ५६ व ५५ टक्केच पाऊस झाल्याने पूर्व भागात अजूनही पिकांची परिस्थिती नाजूक आहे.