'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:09 PM2023-02-25T18:09:32+5:302023-02-25T18:10:01+5:30

रामदास आठवले आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'A city does not develop by changing its name'; Central Minister Ramdas Athawale's reaction on the name change | 'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

'नाव बदलून शहराचा विकास होत नसतो'; नामांतरावरुन रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णयावरुन चर्चा सुरू होत्या. या चर्चेवर शुक्रवारी अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या बैठकीत या दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराच्या मंजुरीसाठी हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेली होते. आता या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय दिला आहे.

नामांतरावरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आरोप करत होते. यावर आता अखेर केंद्राने निर्णय दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’,असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मात्र याचदरम्यान नाव बदलून विकास होत नसतो, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

नाव बदलून शहराचा विकास होत नसतो. औरंगाबादचा विकास होत आहे, पण उस्मानाबाद ड्राय झोन आहे. त्यामुळे नाव बदलून विकास होणार नाही. पण उस्मानाबादचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच मोदी सरकार विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. ते आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं ट्विट-

'औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!  !  असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Web Title: 'A city does not develop by changing its name'; Central Minister Ramdas Athawale's reaction on the name change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.