त्र्यंबकला कोविडमुळे वैधव्य आलेल्या महिलांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 11:48 PM2022-03-12T23:48:16+5:302022-03-12T23:48:57+5:30
त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणारे तोंड याबाबत जाणून घेण्यासाठी या मेळाव्याच्या आयोजनाचा उद्देश होता.

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत मिशन वात्सल्यअंतर्गत विधवा महिला आणि एक पालक गमावलेल्या बालकांसाठी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती भारती गेजगे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी श्रीमती दीपाली रामदास खेडकर, तहसीलदार दीपक गिरासे, गट शिक्षणाधिकारी अनिल शहारे, पंचायत समिती कृषी अधिकारी विटनोर, सहायक गट विकास अधिकारी गोपाल पाठक आदींसह अंगणवाडी सेविका आशासेविका उपस्थित होते. तसेच विधवा महिलांना अद्याप कोणते लाभ प्राप्त झालेले नाहीत, त्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. यासंदर्भात आतापर्यंत आलेले शासकीय आदेशाचे वाचन करण्यात आले. तहसीलदार दीपक गिरासे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लाभ देण्यात आलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कृषी अधिकारी तसेच स्वयंसहायता गट यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात पोषण आहार प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते . तसेच पोषण गुढी उभारण्यात आली होती. आशाताईंनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.