येवल्यात बुद्ध विचारांचे ग्रंथालय साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 08:43 PM2022-02-27T20:43:55+5:302022-02-27T20:45:14+5:30

येवला : राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथील मुक्तिभूमीस भेट दिली. नारनवरे हे दोन दिवसांच्या नाशिक ...

A library of Buddhist thoughts will be set up in Yeola | येवल्यात बुद्ध विचारांचे ग्रंथालय साकारणार

येवल्यात बुद्ध विचारांचे ग्रंथालय साकारणार

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशांत नारनवरे : मुक्तीभूमीच्या कामांचा घेतला आढावा

येवला : राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी येथील मुक्तिभूमीस भेट दिली. नारनवरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी विभागातील विविध योजनांचा आढावा घेत विविध विकासकामांची पाहणी केली. येवला मुक्तिभूमीवर गौतम बुद्धांचा विचार देणाऱ्या साहित्याचे जागतिक दर्जाचे ग्रंथालय निर्माण व्हावे यासाठी विभागाचा प्रयत्न असल्याचे सांगून तसा प्रस्ताव शासनास सादर करावा, असे यावेळी आयुक्त नारनवरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.

येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकास भेट देऊन मुक्तिभूमी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांचा नारनवरे यांनी आढावा घेतला. शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. संपूर्ण परिसराची पाहणी करून दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या बांधकामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदलही त्यांनी सूचित केले.
तालुक्यातील जळगाव नेऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन तेथे मागासवर्गीय महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या पैठणी केंद्रासदेखील आयुक्त नारनवरे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मागासवर्गीय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पैठणी निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, साहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश पवार, मुक्तिभूमी स्मारक संशोधन अधिकारी तथा व्यवस्थापिका पल्लवी पगारे व स्मारकातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 

Web Title: A library of Buddhist thoughts will be set up in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.