थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:55 PM2024-03-15T12:55:00+5:302024-03-15T12:55:20+5:30

शरद पवारांचा फोटो कुठेही वापरेलेला नाही असे सांगितले. परंतु, चिन्ह सध्या आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही ते वापरणारच असेही ठणकावले आहे.

A little discipline must be observed! Shrikant Shinde has no authority; Advice from Chhagan Bhujbal from Nashik hemant Godase Candidacy | थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

हेमंत गोडसे हे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील, कामाला लागा असे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभेत म्हटले होते. यावरून भाजपा त्यांच्यावर अधिकार नसल्याची टीका करत असताना आता महायुतीतील आणखी एक मित्रपक्ष राष्ट्रवादी देखील श्रीकांत शिंदे यांना अधिकार नसल्याचे म्हणत आहे. 

नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काही अधिकार नाही. राजकारणामध्ये थोडी शिस्त ही सगळ्यांनी पाळली पाहिजे, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे यांना फटकारले आहे. तसेच मनसे महायुतीमध्ये आल्यास फायदा होईल का, नाही यावर माझा अभ्यास नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

शरद पवारांचा फोटो वापरत असल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला झापलेले असताना भुजबळ यांनी आम्ही शरद पवारांचा फोटो कुठेही वापरेलेला नाही असे सांगितले. परंतु, चिन्ह सध्या आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही ते वापरणारच असेही ठणकावले आहे. मी स्वतः शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाही. शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा मी असे कुठेही म्हणालो नाही. प्रचार करण्यासाठी अजून वेळेच आली नाही. निवडणुका अजून लागल्या नाहीत, असेही भुजबळ म्हणाले. 

शरद पवारांनी कृषिमंत्री असताना कांद्याला का हमीभाव दिला नाही? त्यांच्या काळात देखील कांद्याचे भाव पडले होते. आता कांद्याचे दर पडले आहेत हे खरे आहे. असे भुजबळ यांनी कबूल केले. 

Web Title: A little discipline must be observed! Shrikant Shinde has no authority; Advice from Chhagan Bhujbal from Nashik hemant Godase Candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.