लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2023 11:16 AM2023-08-06T11:16:37+5:302023-08-06T11:17:39+5:30

नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते.

A major action by the Anti-Corruption Department; Tehsildar arrested red-handed while accepting bribe of 15 lakhs | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

googlenewsNext

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार या पदावर कार्यरत असलेले नरेश कुमार बहिरम यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आले. नाशिक शहरातील बहिरम यांच्या कर्मयोगी नगर येथील निवासस्थाना जवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली. गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी बहिरम यांनी लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील एका जमिनीतून मुरूम उत्खननाचे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत नियमानुसार पाचपट दंड आणि जागा मालकास जागा भाडे असे मिळून एकूण १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपये इतका दंड ठोठवण्यात आला होता. मात्र या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चौकशीसाठी तहसीलदार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

याबाबत जागेची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम हे राजुर बाहुला येथील तक्रारदारांच्या जमिनीवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी याप्रकरणी तडजोड करण्यासाठी आणि दंडाची रक्कम कमी करण्यासाठी १५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना बहिरम यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

Web Title: A major action by the Anti-Corruption Department; Tehsildar arrested red-handed while accepting bribe of 15 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.