सलीम कुत्ता सोबतची पार्टी, भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केली; संजय राऊतांनी फोटोच दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 01:45 PM2023-12-24T13:45:31+5:302023-12-24T13:46:48+5:30
खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला.
नाशिक- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेला सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले, यानंतर विधीमंडळात ठाकरे गटाने मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही फोटो दाखवत आरोप केले. आता खासदार संजय राऊतांनी ही पार्टी भाजप पदाधिकाऱ्यानेच आयोजित केल्याचा आरोप केला असून पत्रकार परिषदेत दोन फोटो दाखवून याचा पुरावा दिला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू होणार आहेत.
"बावनकुळेंचा तो व्हिडीओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. त्या व्हिडीओशी सुधाकर भाऊंशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ कोणी दिला ते नागपूर वाल्यांना माहिती आहे. ती पार्टी आहे ती भाजप वाल्याने आयोजित केली होती, ती पार्टी भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याने आयोजित केली होती. त्या गुन्हेगाराला पॅरोलवर कोणी सोडले याची आधी चौकशी करा. २०१६ ला गृहमंत्री कोण होत ते पाहा, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय संजय राऊत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवला.
"गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांचा कसा बुरखा फाटला आहे हे आम्ही दाखवले आहे. सुधाकर बडगुजर ज्या पार्टीला गेले होते ती पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा प्रत्यारोप राऊत यांनी केला आहे.
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका
अटी शर्तींवर प्रोजेक्ट दिला त्याविरोधात आम्ही मोर्चा काढला
उद्योगपती अनेकांना देणग्या देत असतात. आम्ही अदानींविरोधात धारावीबाबत मोर्चा काढला आहे. धारावीबाबत त्यांना दिलेल्या प्रोजेक्टमध्ये काही अटी शर्तींविरोधात आम्ही आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.