हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक!

By संजय पाठक | Published: August 21, 2023 07:01 PM2023-08-21T19:01:54+5:302023-08-21T19:02:10+5:30

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केली होती.

A procession of Kapaleshwar to Nashik in the sound of Har Har Mahadev Bam Bam Bhole! | हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक!

हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नाशिकला कपालेश्वराची मिरवणूक!

googlenewsNext

नाशिक-  हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष करत शेकडो भाविकांनी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त
रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. सायंकाळी कपालेश्वराच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.

महादेवाचे मंदिर म्हटले की,  त्यासमोर नंदी असतोच मात्र नंदी नसलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. आज पहाटे कपालेश्वर मंदिरातील वंश परंपरागत गुरव अनिल भगवान आणि पुजारी वर्गाच्या उपस्थितीत महादेवाचे पूजन, अभिषेक करण्यात येऊन आरती करण्यात आली. पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी मंदिरात अभिषेक पूजन करण्यासाठी ब्रह्म वृंदांकडे गर्दी केली होती. 

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा विश्वस्त मंडळाने भाविकांना मुख्य प्रवेशदाराने महिला, पुरुष भाविकांच्या दोन रांगा करत दक्षिण व उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याची व्यवस्था केली होती तर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्यास मनाई केली होती. सायंकाळी कपालेश्वराच्या मुखवट्याची स्वाती मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंदिराच्या परिसरात तसेच काळाराम मंदिर येथे भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच पुष्पदृष्टी करण्यात आली.

Web Title: A procession of Kapaleshwar to Nashik in the sound of Har Har Mahadev Bam Bam Bhole!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.