तब्बल पावणेदोन वर्षांनंतर बाधित एका आकड्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 01:49 AM2022-03-11T01:49:56+5:302022-03-11T01:50:27+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १०) एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, तब्बल पावणेदोन वर्षांच्या कालावधीनंतर बाधित रुग्ण एका आकड्यात ९ इतके आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही नागरिकाचा मृत्यूदेखील न झाल्याने एकूण बळींची संख्या ८८९९ वर कायम आहे.

A staggering figure after two years! | तब्बल पावणेदोन वर्षांनंतर बाधित एका आकड्यात !

तब्बल पावणेदोन वर्षांनंतर बाधित एका आकड्यात !

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात बाधित अवघे ९; कोरोनामुक्त ३६

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १०) एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, तब्बल पावणेदोन वर्षांच्या कालावधीनंतर बाधित रुग्ण एका आकड्यात ९ इतके आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकाही नागरिकाचा मृत्यूदेखील न झाल्याने एकूण बळींची संख्या ८८९९ वर कायम आहे.

जिल्ह्यात यापूर्वी २९ जून २०२० या दिवशी एका आकड्यात म्हणजे सहा रुग्ण बाधित आढळून आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थी संख्यादेखील दीडशेपेक्षा कमी होऊन १४८वर आली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रलंबित अहवालांची संख्या ५३२ असून, त्यात सर्वाधिक ४८० अहवाल, नाशिक मनपा ३२, मालेगाव मनपाचे २० अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८४ टक्के, तर कोरोनामुक्ततेचा दर ९८.१० टक्के आहे.

Web Title: A staggering figure after two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.