लाल फितीचा अजब कारभार; भेसळयुक्त तेल तपासणीसाठी ५ जिल्ह्यांना केवळ तीनच यंत्र

By Suyog.joshi | Published: October 7, 2023 12:54 PM2023-10-07T12:54:33+5:302023-10-07T12:55:41+5:30

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात.

A strange administration of red tape; Only three machines for 5 districts to check adulterated oil | लाल फितीचा अजब कारभार; भेसळयुक्त तेल तपासणीसाठी ५ जिल्ह्यांना केवळ तीनच यंत्र

लाल फितीचा अजब कारभार; भेसळयुक्त तेल तपासणीसाठी ५ जिल्ह्यांना केवळ तीनच यंत्र

googlenewsNext

सुयोग जोशी

नाशिक - पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक विभागात वारंवार तळल्या जाणाऱ्या तेलामधील भेसळ ओळखणारे टीपीसी मशीन केवळ तीनच उपलब्ध असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात तेलातील भेसळ ओळखणार कशी, असा प्रश्न अन्न व औषध प्रशासन विभागासमोर उभा राहिला आहे.

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले खाद्य पदार्थ हे वेगेवेगळ्या तेलांपासून बनविले जातात. पण, त्यांच्यातही सध्या भेसळ केली जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यात भेसळीच्या काही तक्रारी आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाईही केली जाते. परंतु, तेलामध्ये स्वस्त, निकृष्ट, हानिकारक किंवा अनावश्यक पदार्थ जोडले जातात ज्यामुळे त्याचे स्वरूप आणि गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. याच कारणास्तव या विभागामार्फत कारवाईसाठी सज्ज असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र केवळ तीनच यंत्रे उपलब्ध आहेत.

काय आहे टीपीसी मशीन?
टीपीसी म्हणजेच टोटल पोलर काऊंट मशीन. या मशीनद्वारे जळालेले तेल तपासता येते. त्या तेलात भेसळ आहे की नाही, याचीही स्पष्टता होते. त्यानंतर या विभागाकडून संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाते. त्यांना दंड ठोठावला जातो.

विभागातील टीपीसी मशीन
नाशिक-१
नगर-१
धुळे-जळगाव-१
नंदुरबार-०

कर्मचाऱ्यांची उणीव
जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने अन्न व औषध प्रशासनाला सध्या मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. या विभागात एकूण १९ पदे मंजूर असून, केवळ सहाच अधिकारी आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अनेकवेळा कारवाई करताना अडचणी येतात. कमी माणसांमुळे कारवाईसाठी दूर जाणेही अवघड होऊन बसते. त्यासाठी शासनाने या विभागाला जास्तीतजास्त आहे ती पदे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे. शिवाय क्लेरिकलच्या जागाही रिक्त आहेत. अधिकाऱ्यांनाच क्लेरिकलची कामे करावी लागतात.

एकाच गाडीवर कारभाराचा भार
नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला केवळ एकच वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कारवाया करताना अडचणी येत असल्याचे समजते. एकच वाहन असल्याने कोण अधिकारी अगोदरच एखाद्या कारवाईसाठी जर ते वाहन घेऊन गेला असेल तर नंतर काही तक्रारींचा कॉल आला तर अडचण निर्माण होते. या विभागाकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच गाडीवर कारभार हाकताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत आहे.

कमी मनुष्यबळावर आम्ही काम करीत आहोत. दुधामधील भेसळसह इतर कारवाया आम्ही करीत आहोत. जेथे जेथे अन्नपदार्थांमध्ये भेसळ होईल त्या-त्या ठिकाणांवर आमची करडी नजर आहे.
- विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

Web Title: A strange administration of red tape; Only three machines for 5 districts to check adulterated oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक