मनमाडजवळ टँकर उलटून हजारो लिटर इंधन वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 01:25 AM2022-04-28T01:25:11+5:302022-04-28T01:25:34+5:30

मनमाड : चांदवड- मनमाड- जळगाव राज्य महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी मनमाड- नांदगाव ...

A tanker overturned near Manmad, wasting thousands of liters of fuel | मनमाडजवळ टँकर उलटून हजारो लिटर इंधन वाया

आग लागू नये म्हणून कंपनीचे कर्मचारी फोम मारताना आणि बघणाऱ्यांची गर्दी.

Next
ठळक मुद्देपानेवाडी शिवारातील घटना ; सुदैवाने जीवितहानी टळली

मनमाड : चांदवड- मनमाड- जळगाव राज्य महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. बुधवारी (दि. २७) दुपारी मनमाड- नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारात रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून इंधन भरलेला टँकर नाल्यामध्ये उलटला. यामुळे हजारो लिटर इंधन रस्त्यावर वाहून गेले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पामधून इंधन भरून भुसावळकडे टँकर (क्र.एमएच १९ झेड ९९८८) मनमाड- नांदगाव रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या गाडीला रस्ता देण्याच्या नादात रस्त्यावरील पडलेल्या खडीवरून घसल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये उलटला, त्यामुळे हजारो लिटर इंधन रस्त्याने वाहू लागले.

ही घटना नागरिकांना कळताच काहींनी मिळेल त्या भांड्यांमध्ये हे इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खडीचे गंज पसरलेले आहेत. त्यामुळे टँकर उलटल्याचे सांगण्यात येते. टँकर उलटल्याची घटना संबंधित कंपनीला कळल्यानंतर तातडीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणि फोम बाटल्या घेऊन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

अपघातस्थळी कंपनीचे अधिकारी शंकर भाबड, योगेश आथर्डे, अशोक गीते, साहेबराव दराडे, कमलेश सांगळे, प्रकाश गीते आदींसह चालक-मालक यांनी मदतकार्य केले.

 

Web Title: A tanker overturned near Manmad, wasting thousands of liters of fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.