उन्हापासून बचावासाठी मतदारांसाठी टाकले मंडप
By Suyog.joshi | Published: May 19, 2024 11:06 AM2024-05-19T11:06:10+5:302024-05-19T11:06:19+5:30
वाढता उन्हाचा तडका बघता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना दिवस गणिक वाढणाऱ्या उन्हाच्या तडाका बसू नये म्हणून मंडप टाकण्यात आले आहे.
संजय शहाणे
इंदिरानगर (नाशिक) -लोकसभा निवडणुकीसाठी परिसरातील मतदान केंद्रावर खुर्च्या टेबलसह साहित्य आणि मतदारांना उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी मंडप टाकण्यात आले आहे.
सोमवार (दि20) सकाळी आठ ते पाच सायंकाळी वाजेपर्यंत जॉगिंग ट्रॅक ते पाथर्डी गाव दरम्यान 27 मतदान केंद्र आणि 94 बुथवर मतदान होणार आहे. त्यासाठी परिसरातील मतदान केंद्र व बूथ वर खुर्च्या टेबल सह इतर साहित्य आणण्यात आले आहे.तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे वापरण्याचे पाण्याची सोय करण्यात आली आहे. वाढता उन्हाचा तडका बघता मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांना दिवस गणिक वाढणाऱ्या उन्हाच्या तडाका बसू नये म्हणून मंडप टाकण्यात आले आहे.