पाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ; हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 02:28 PM2023-03-14T14:28:51+5:302023-03-14T14:29:58+5:30

तळवाड्याचे हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना

A unique sadhana of Haripath, Habhap Krishna Raundal singing "Tarang Asana" on water | पाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ; हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना

पाण्यावर 'तरंग आसन' करून गायला हरिपाठ; हभप कृष्णा रौंदळ यांची अनोखी साधना

googlenewsNext

बंडू खडांगळे

लखमापुर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) : भारतीय संस्कृतीमध्ये अनेक भक्ती साधनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यात ध्यानधारणा, समाधी, विविध स्वरूपांचे आसने, विविध मंत्राचे पठण यामार्गाने प्रत्येक जण साधना करून भगवंताची भक्ती करीत असतो. परंतु याही पलीकडे जात पाण्यावर तरंग आसन संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ गाऊन भक्ती करतात ते बागलाण तालुक्यातले तळवाडे (दिगर) गावाचे हभप कृष्णा महाराज रौंदळ.

सध्या संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथे नाथ षष्ठी मोठ्या उत्साहात चालू आहे. येथील नाथसागरात पवित्र स्नान असंख्य भाविक भक्त करीत असतात व देह पवित्र करीत असतात. परंतु ज्यांनी आतापर्यंत चार पायी नर्मदा परिक्रमा करून व आपल्या समाजप्रबोधनातुन जनजागृती करत हभप कृष्णा महाराज रौंदळ तळवाडेकर यांनी पैठणच्या नाथसागरात पाण्यांवर तरंग आसन लावून चक्क ज्ञानोबारायांचा हरिपाठ खोल पाण्यावर तरंगुन गायला व उपस्थित भाविक भक्तांना हरिपाठात काय भक्ती महिमा आहे. हे सिध्द करून दाखविले. कृष्णा महाराज यांनी या तरंग आसनावर नर्मदा मातेच्या तीरावर नर्मदे हर या भक्ती मय मंत्राचा उच्चार करून भाविक भक्तांची मने जिंकून घेतले आहे. सध्या वयाची साठ वर्षे पुर्ण केलेली असताना तबल चार सलग नर्मदा परिक्रमा, आळंदी ,पंढरपूर,त्र्यंबकेश्वर, पैठण या क्षेत्रावरील पायी वारी केल्या आहेत.

तरंग आसन संर्दभात बोलताना रौंदळ महाराज म्हणतात की, मला पाण्यात पोहण्याची सवय लहानपणांपासुन होती. परंतु ज्या दिवशी माझी परार्मथाची सुरुवात गुरूमाऊली कृष्णा माऊली खायदेकर यांनी केली तेव्हापासून मला या तरंग आसनावर हरिपाठ गाण्याची सवय लागली. यामागे माझे सद्गुरू कृष्णा माऊली खायदेकर यांचा मोठा आशीर्वाद आहे.

मी वेगवेगळ्या स्वरूपांची आसने आजही मोठ्या प्रमाणावर करतो. आसने ,पायी वारी इ.केल्याने आजही मी वयाची साठी पुर्ण करून मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. मी पुर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत . व्यसनाधिन जीवन जगण्यापेक्षा विविध आसने,परार्मथाची कास धरा व आपले जीवन यशस्वी करा.

हभप कृष्णा महाराज रौंदळ (तळवाडेकर)
 

Web Title: A unique sadhana of Haripath, Habhap Krishna Raundal singing "Tarang Asana" on water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.