नाशिकच्या निफाडजवळ नौकानयनाचा सराव करणारा युवक गोदावरीत बुडाला

By अझहर शेख | Published: November 7, 2022 12:47 PM2022-11-07T12:47:05+5:302022-11-07T12:47:41+5:30

चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचे शोध कार्य सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने कळवले आहे.

A youth practicing sailing drowned in the Godavari near Niphad in Nashik | नाशिकच्या निफाडजवळ नौकानयनाचा सराव करणारा युवक गोदावरीत बुडाला

नाशिकच्या निफाडजवळ नौकानयनाचा सराव करणारा युवक गोदावरीत बुडाला

Next

नाशिक : येथील निफाड तालुक्यातील चांदोरी-सायखेडा शिवारातील गोदावरी नदीपात्रात जलतरण बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी  विद्यार्थी  पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी सव्वा आठ वाजेपासून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचे शोध कार्य सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने कळवले आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर (२०) हा सायखेडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो चाटोरी तालुका निफाड येथील असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. घटनास्थळी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथक शोध कार्य करत आहे. या पथकामध्ये सायखेडा पोलीस, तसेच चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, सोमनाथ कोटमे,मधुकर आवारे, संतोष लगड यांचा समावेश आहे.  

हा युवक गोदावरी नदी पात्रात बोटिंगचा सराव करत होता.  सुमारे ५० फूट खोल गोदावरी नदीचे पाणी पातळी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सांगितले. सकाळी सव्वा आठ वाजेपासून आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा गोदावरी नदीपात्रात शोध घेतला जात असून सकाळी ११ वाजेपर्यंत या शोध कार्याला यश आले नव्हते, दरम्यान घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक परिसरातील ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित आहेत.

Web Title: A youth practicing sailing drowned in the Godavari near Niphad in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक