आधार प्रमाणिकरण कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 02:10 PM2020-06-23T14:10:29+5:302020-06-23T14:10:40+5:30
ब्राह्मणगाव : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण कामास प्रारंभ करण्यात आला.
ब्राह्मणगाव : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण कामास प्रारंभ करण्यात आला. या कर्जमुक्तीस पात्र लाभार्थ्यांची पीक कर्ज व पूर्णगठीत पीक कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ करण्यात आला. बाळासाहेब अहिरे यांना प्रथम प्रमाण पत्र देण्यात आले.
म्हाविकास आघाडी सरकारने थकित असलेल्या व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत असलेले शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्ज व पूनर्गठीत पीक कर्ज माफ होणार आहे. या योजनेच्या आधार प्राधिकरणाचे काम जिल्हा बँकेचे शाखेत सुरू झाले असून या कर्ज माफी योजनेस एकूण ३२८ सभासद पात्र आहेत. त्यांना तीन कोटी चौदा लाख पंधरा हजार एकशे चोवीस रु पये कर्ज माफ होणार आहे. यात ब्राह्मण गाव सहकारी संस्थेचे १९० सभासद त्यांना एक कोटी ८०, ४४,०७७ रु पये, भाऊसाहेब हिरे संस्थेचे ८४ सभासदांना ९४,२७,८५० रु पये, यशवंतनगर सहकारी संस्थेचे ५४ सभासदांचे ३९,४३, १९८ रूपये कर्ज माफी होणार आहे. या प्रसंगी जिल्हा बँक शाखाधिकारी एस .डी.परदेशी, विनोद अहिरे, दिलीप अहिरे , तसेच शिवसेनेचे बाळासाहेब अहिरे उपस्थित होते.