जिल्ह्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:14+5:302020-12-25T04:13:14+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण ...

Aadhaar update of 85% students in the district | जिल्ह्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट

जिल्ह्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट

Next

नाशिक : जिल्ह्यातील ८५ टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रयोग राबविला जाणार असून, यासाठी तालुकास्तरावर विशेष यंत्रणा व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील ३३२४ प्राथमिक व १३२४ माध्यमिक अशा मिळून ४६४८ शाळ‌ांमधील १३ लाख ३७ हजार ६२ विद्यार्थ्यांपैकी ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत जवळपास ११ लाख ४० हजार २२३ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आधार अपडेट करण्यात आले आहे. तर अजूनही १ लाख ९६ हजार ८२९ विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही. त्यामुळे यावर्षीची संचमान्यताही अद्याप होऊ शकलेली नाही. पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेतील शिक्षकांच्या संचमान्यता निकषात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवीन निकषाप्रमाणे माध्यमिक शाळांमधील पाचवीचा वर्ग नजीकच्या एक किलोमीटर परिसरातील प्राथमिक शाळेला जोडला जाणार आहे. तर खासगी अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक

शाळांतील विद्यार्थी संख्या अनुक्रमे १५, २० आणि २५ यापेक्षा कमी असल्यास या शाळेतील शिक्षकांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्येला महत्त्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांची एकाहून अधिक शाळांमध्ये नोंद करण्याचा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केल्यानंतरच संचमान्यता होणार आहे. त्यामुळे के‌वळ १५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचे अपडेशन झालेले नसल्यामुळेच संचमान्यता रखडल्याची सध्या चर्चा सध्या सुरू आहे.

प्राथमिक शाळांच्या शिक्षक संच मान्यतेचे निकष

पहिली ते चौथी: १५० पटसंख्येपर्यंत प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक असे एकूण पाच शिक्षक, १५० ते २०० एक मुख्याध्यापक, २०० च्या वर पट झाल्यास प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, सहावी ते आठवी वर्गासाठी प्रत्येक

३५ मुलांमागे एक याप्रमाणे शिक्षक पदे मंजूर केली जाणार आहेत. दरम्यान, सहावी व सातवी हे दोनच वर्ग

असणाऱ्या शाळांसाठी दोन, तर आठवीचा वर्ग असणाऱ्या शाळांच्या ७० पर्यंतच्या पटसंख्येसाठी तीन शिक्षक दिले

जाणार आहेत.

माध्यमिक शाळांचे संचमान्यता निकष

पाचवी ते दहावी १७५ पटांपर्यंत पाच पदे. पुढील प्रत्येक ३५ विद्यार्थ्यांच्या तुकडीमागे एक शिक्षक दिला जाणार

आहे. आठवी ते दहावी १०५ विद्यार्थी संख्येपर्यंत तीन पदे, तर त्यानंतर प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर

होणार आहे. ८ ते १५ शिक्षक मंजूर होणाऱ्या शाळेला एक, तर ३२ ते ३९ शिक्षक असणाऱ्या शाळेला दोन क्रीडा शिक्षक दिले

जाणार आहेत. १६ ते २३ शिक्षक असणाऱ्या शाळेला एक, तर ४० ते ४७ शिक्षक मंजूर होणाऱ्या शाळेला दोन कला

शिक्षक दिले जाणार आहेत. २४ ते ३१ शिक्षक असणाऱ्या शाळेला कार्यानुभव विषयासाठी एक, तर ४८ ते ५५ शिक्षक

असलेल्या शाळेला कार्यानुभवचे दोन शिक्षक दिले जाणार आहेत.

पॉईंटर-

-जिल्ह्यातील शाळा - ४६४८

-विद्यार्थी १३ लाख ३७ हजार ६२ विद्यार्थी

-८५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट

-तालुकानिहाय आधार अपडेट विद्यार्थ्यांची टक्केवारी

तालुका - टक्केवारी

चांदवड - ९४.०१

पेठ - ९३.९२

दिंडोरी - ९३.१०

नाशिक ग्रा. - ९३.९३

देवळा - ९२.०३

निफाड - ९१.८८

नांदगाव - ९१.४९

इगतपुरी - ९१.४४

सिन्नर - ९१.३९

कळवण - ९१.००

बागलाण - ९०.८७

सुरगाणा - ९०.०२

येवला - ९०.०२

त्र्यंबकेश्वर - ८७.२४

मालेगाव ग्रा - ८४.६१

नाशिक मनपा-१ - ८०. २२

नाशिक मनपा-२ - ७८.१७

मालेगाव मनपा - ६७.९५

Web Title: Aadhaar update of 85% students in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.