बालकांसाठी विभागीय कार्यालयांमध्ये आधारकार्ड
By Admin | Published: November 5, 2016 02:13 AM2016-11-05T02:13:50+5:302016-11-05T02:26:05+5:30
निर्णय : कार्यालयांमध्ये आधार किट्स
नाशिक : नवीन आधार लिंक जन्म नोंदणी राज्यात कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने महापालिकेने आपल्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आधारकार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यापुढे राज्यात नवजात बालकांचीदेखील आधार नोंदणी क्रमप्राप्त करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने शून्य ते सहा या वयोगटांतील बालकांबरोबरच ज्या पालकांनी अद्याप आधारकार्डची नोंदणी केली नसेल त्यांच्यासाठी सहाही विभागीय कार्यालयात आधारकार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने त्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये आधार किट््स बसविले असून, नागरिकांसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, जन्मदाखल्यावर आधार नोंदणीबाबत मात्र महापालिकेकडून अद्याप कसल्याही सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्याबाबतचे छापील फॉर्मही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवजात बालकांची आधार नोंदणी कशी आणि कधी होणार याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. (प्रतिनिधी)