सिडको प्रभाग सभेत अजब सत्कार :उद्यान अधिकाºयाला कुºहाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:36 AM2017-11-28T00:36:40+5:302017-11-28T00:38:55+5:30

सिडको भागातील बहुतांशी सर्वच नैसर्गिक नाल्यांमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही काही भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उद्यान विभागाकडून कोणतेही कामकाज होत नसल्याने संबंधित अधिकाºयांचा उद्यानकामासाठी लागणारी कुºहाड आणि शिडी देऊन सभागृहातच गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.

Aadhar fest in the CIDCO ward meeting: Huge visit to the garden officer | सिडको प्रभाग सभेत अजब सत्कार :उद्यान अधिकाºयाला कुºहाड भेट

सिडको प्रभाग सभेत अजब सत्कार :उद्यान अधिकाºयाला कुºहाड भेट

Next
ठळक मुद्देकारखान्यांचे रसायनयुक्त पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात सभागृहातच गांधीगिरी पद्धतीने सत्कार

सिडको : सिडको भागातील बहुतांशी सर्वच नैसर्गिक नाल्यांमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही काही भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उद्यान विभागाकडून कोणतेही कामकाज होत नसल्याने संबंधित अधिकाºयांचा उद्यानकामासाठी लागणारी कुºहाड आणि शिडी देऊन सभागृहातच गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच प्रभागातील मूलभूत सुविधादेखील सुटत नसल्याने प्रभाग सभेला फक्त चहा-पाणी करण्यासाठीच यायचे का, असा संतप्त सवाल करीत अधिकाºयांविषयी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  प्रभाग समितीची मासिक सभा प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जादा विषयांसह लाखो रुपयांच्या विविध विकासकामांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रत्येक महिन्याला प्रभाग सभा होत असताना अधिकाºयांना सांगितलेली कामे होत नसून प्रभाग सभेत चहा-पाण्यासाठीच यायचे का, असा सवाल नगरसेवक प्रतिभा पवार यांनी केला. तर नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडको शॉपिंग सेंटर येथील नो हॉकर्स झोनच्या जागी सर्रासपणे अतिक्रमण झाले आहे. गोविंदनगर भागासह सिटी सेंटर मार्गाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरदेखील दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, यामुळे अपघात होत असताना अधिकारी काय करतात, असा संतप्त सवालही नगरसेवक पांडे यांनी केला.  नगरसेवक सुवर्णा मटाले यांनी सांगितले की, प्रभागात चार नगरसेवक असल्याने सावळा गोंधळ निर्माण झाला असून, प्रभागातील खड्डे बुजविले जात नसल्याची तक्रार केली. नगरसेवक दीपक दातीर यांनी सांगितले की, अधिकारी हे चेहरे बघून काम करीत असून, असा दुजाभाव करणाºया अधिकाºयांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. नगरसेवक नीलेश ठाकरे म्हणाले की, प्रभाग २९ मध्ये गल्लीबोळात व लहान रस्ते असलेल्या भागात घंटागाडी जात नसल्याने मिनी घंटागाडीची व्यवस्था करण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून करीत असतानाही आरोग्य विभागाच्या ढीम्म अधिकाºयांनी अद्यापही गाडी सुरू केली नाही. यामुळे यापुढील काळात जोपर्यंत मिनी घंटागाडी सुरू होत नाही तोपर्यंत ज्या नागरिकांच्या घरासमोर घंटागाडी जाणार नाही त्यांना बरोबर घेत संबंधित अधिकाºयांच्या दालनातच कचरा आणून टाकणार असल्याचे सांगितले.  पाथर्डी फाटा ते वडनेर गेट या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, यामुळे कायमच अपघात होत असल्याचे भगवान दोंदे यांनी सांगतले.  नगरसेवक राकेश दोदे यांनी म्हणाले की, प्रभागातील शांतीनगर या भागात परिसरातील कुत्रे आणून सोडत असल्याने याचा बंदोबस्त करावा. नगरसेवक किरण गामणे, छाया देवांग, चंद्रकांत खाडे, पुष्पा आव्हाड व संगीता जाधव यांनी चर्चेत भाग घेतला. 
मंजुरी न घेता रस्ता खोदकाम; अधिकाºयांकडून घेणार भरपाई 
सिडको प्रभाग २५ मधील तोरणानगर भागातील नव्याने तयार करण्यात आलेला मुख्य रस्ता मनपा आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम विभागाचे अधिकारी ए. जे. काजी यांनी फोडल्याने याबाबत प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी त्यांना जाब विचारला. तसेच आयुक्तांची मंजुरी न घेता रस्ता खोदकाम केल्याने याचा सर्व खर्च संबंधित अधिकाºयांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी संगितले.

Web Title: Aadhar fest in the CIDCO ward meeting: Huge visit to the garden officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.