आली.. आली यंत्रसामग्री दाखल झाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:36+5:302021-06-28T04:11:36+5:30
जिल्हा वार्षिक योजनेतून कळवण उपजिल्हा रुग्णालयात एक कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर झाला असून, जळगाव ...
जिल्हा वार्षिक योजनेतून कळवण उपजिल्हा रुग्णालयात एक कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर झाला असून, जळगाव येथील लक्ष्मी सर्जिकल या कंपनीला प्रकल्प उभारणीचे काम देण्यात आले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान बालकांवर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० बेडचे चिल्ड्रेन कोविड सेंटरदेखील सुरू करण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा जोडणीचे काम येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून, ऑक्सिजन प्लांट, टॅंक आदी यंत्रसामग्री आली आहे. दोन दिवसात कॉम्प्रेसर येणार आहे. प्लांटसाठी शेड उभारण्यात येणार आहे. ५४० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचा हा प्रकल्प येत्या १५ दिवसात कार्यन्वित होईल, अशी माहिती लक्ष्मी सर्जिकलचे अजित जोशी यांनी दिली. दररोज ११० ते १२० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरू शकेल एवढी त्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामधील ऑक्सिजन सुमारे १२० रुग्णांना उपयोगी ठरणार आहे.
इन्फो
रुग्णांची होणार सोय
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड झाली. अनेक रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावली. हे लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. आता येत्या १५ दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार असल्यामुळे ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
कोट...
कळवण उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होणार असून, विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे लिक्विड ऑक्सिजनची गरज भासणार नाही. नैसर्गिक स्वरूपात हवेतील प्राणवायू यातून मिळू शकणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होणार असून, देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील कमी असणार आहे. शिवाय ऑक्सिजन निर्मितीसाठी वीजबिलाशिवाय दुसरा कोणताही खर्च राहणार नाही
- डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक
कोट....
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची असलेली गरज लक्षात घेऊन कळवण, अभोणा, सुरगाणा, बाऱ्हे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर केले. कळवण येथे प्रकल्पाची मशिनरी आली आहे. येत्या १५ दिवसात प्रकल्प कार्यान्वित होईल, असे नियोजन आहे. पुढील टप्प्यात अभोणा, सुरगाणा, बाऱ्हे येथील प्रकल्प पूर्ण होतील.
- नितीन पवार, आमदार
फोटो- २७ कळवण ऑक्सिजन
कळवण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाची यंत्रसामग्री दाखल झाल्यानंतर माहिती घेताना आमदार नितीन पवार. समवेत डॉ. अनंत पवार, अजित जोशी, राजेंद्र भामरे, भूषण पगार, संदीप वाघ आदी.
===Photopath===
270621\27nsk_20_27062021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ कळवण ऑक्सिजन कळवण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाची यंत्रसामुग्री दाखल झाल्यानंतर माहिती घेतांना आमदार नितीन पवार. समवेत डॉ. अनंत पवार, अजित जोशी, राजेंद्र भामरे, भूषण पगार, संदीप वाघ आदी.