इम्पथी फाउण्डेशन व लोकसहभागातून दापूर शाळेला सुसज्ज इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:35 PM2019-06-25T18:35:15+5:302019-06-25T18:35:54+5:30
दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषदेच्या १९ लाखांच्या निधी व ग्रामस्थांनी उभारलेला सहा लाखांचा लोकसहभाग या इमारतीसाठी लाभला आहे. इम्पथी फाउण्डेशनचे मुख्य विश्वस्त शांतिलाल छेडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेश्वरम, प्रमुख अतिथी चंद्रेश शहा, फॅनिबेन शहा यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेल्या मान्यवरांना फेटे बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी राजीव लहामगे, केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके, संजय आव्हाड, सुनील आव्हाड, भाऊसाहेब कांदे, रामदास आव्हाड, संदीप आव्हाड, धीरज सोमाणी, अजित निरगुडे, नवनाथ बोडके, संगीता बोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरक्ष सोनवणे यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी ही माहिती दिली.