आम आदमी स्वबळावर निवडणूक लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:54+5:302021-01-14T04:12:54+5:30
जेलरोडच्या शिवाजीनगर समाज मंदिरात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत पक्ष संघटन मजबुती, मनपा निवडणुकीची रणनीती आदींवर चर्चा ...
जेलरोडच्या शिवाजीनगर समाज मंदिरात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत पक्ष संघटन मजबुती, मनपा निवडणुकीची रणनीती आदींवर चर्चा झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी आम आदमी पक्ष नाशिक महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करत सहा जणांनी उमेदवारी मागितल्याचे सांगितले. नाशिकमध्ये वेगवेगळ्या माफियांचे राज्य आहे. त्यातून नागरिकांची मुक्तता करून वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा नागरिकांना देणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नाशिकमध्ये ठरावीक कुटुंबांकडेच सत्ता असते. जन सभांमधून नाशिककरांशी संवाद साधून आम आदमी विकासाची ब्लू प्रिंट तयार करेल. कोल्हापूर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबादप्रमाणेचे नाशिकमध्येही लोकवर्गणी काढून निवडणूक लढविली जाणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश उगले, जितेंद्र भावे, विनायक येवले, योगेश कापसे, स्वप्निल घिया, अभिजित गोसावी, एकनाथ सावळे, जगमेरसिंग, महेंद्र मगर, मंजूषा जगताप, शुभम पडवळ, अनिल फोकणे, दीपक सरोदे, विकास पाटील, संजय कातकाडे, नंदू सानप आदी पदाधिकारी उपस्थित होते.