‘आम आदमी‘चे ‘लिंबू-मिरची’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:48 AM2018-04-26T00:48:39+5:302018-04-26T00:48:39+5:30
राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून ‘आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले.
नाशिक : राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणाºयाला वैद्यकीय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून ‘आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले. येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयामध्ये येणाºया रु ग्णांवर वैद्यकीय उपचार न करता, त्यांच्यावर तंत्र-मंत्राद्वारे, राशींच्या खड्यांद्वारे उपचार करण्यात यावे, अशी उपरोधिक मागणीही ‘आप’च्या पदाधिकाºयांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा घालून जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. राशींच्या खड्यांत स्वारस्य दाखविणाया वैद्यकीय अधिकाºयाच्या कृतीचा निषेध नोंदविला. आंदोलनात जितेंद्र भावे, जसबीर सिंग, विनायक येवले, गिरीश उगले आदी सहभागी झाले होते.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले यांनी निवेदन स्वीकारून संबंधितांची चौकशी सुरू झाली असून, त्याद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी जिल्हा रुग्णालयातील अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्गाबाबतही होले यांनी लवकरच भरतीप्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.