औंदाणे ग्रामपंचायतीत बोगस लाभार्थींना गाळे

By admin | Published: May 17, 2017 12:12 AM2017-05-17T00:12:12+5:302017-05-17T00:13:56+5:30

गैरव्यवहार : माहिती अधिकारात उघड झाला प्रकार

Aandane gram panchayat bogus beneficiaries | औंदाणे ग्रामपंचायतीत बोगस लाभार्थींना गाळे

औंदाणे ग्रामपंचायतीत बोगस लाभार्थींना गाळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : औंदाणे येथील ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला.
शहरालगतच असलेल्या औंदाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या यशवंतनगर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत सन २०१०-११ मध्ये व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गाळे वाटप करताना लाभार्थींची निवड बांधकामाचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच झालेली असते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे वाटप करताना जी कारणे कागदोपत्री दाखविली आहेत त्यापैकी कोणताही लाभार्थी या गाळ्यांमध्ये स्वत: व्यवसाय करताना दिसत नसून त्याने भाडेतत्त्वावर हे गाळे दुसऱ्या व्यावसायिकांना चालविण्यास दिले आहेत. ग्रामपंचायतीला मात्र नाममात्र भाडे दिले जाते. दि. ३१ मे २००९ व २ आॅक्टोबर २०१० च्या ग्रामसभांमध्ये अनुक्र मे ९४ व ४५ ग्रामस्थांची उपस्थिती होती. या सभांना गणपूर्तीचा अभाव असतानादेखील ग्रामपंचायत प्रशासनाने गाळे बांधकामाचा ठराव करताना गरजू व अपंग व्यक्तींना व्यवसायासाठी गाळे बांधण्याच्या ठरावाला मंजुरी दिली.
औंदाणे येथील तत्कालीन सरपंच कैलास निकम, ग्रामसेवक नारायण पवार यांच्या काळातील हा प्रकार आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत यशवंतनगर येथे गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. या योजनेचा प्रस्ताव सादर करतानाच शोभा प्रकाश निकम, भारताबाई भिका पवार, संजय पांडुरंग खैरनार, लक्ष्मण गणेश गोसावी, आशा वसंत पंडित, सुरेश शंभूसिंग जोहरी, श्याम रामदास वडगे यांना वैयक्तिक व्यवसायासाठी व अम्मा भगवान महिला बचतगट, यशवंत महिला बचतगट, सप्तशृंगी महिला बचतगट यांना कागदोपत्री गाळे वितरित करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या लाभार्थींनी जादा भाडेपट्ट्याने दुसऱ्या व्यावसायिकांना गाळे दिले आहेत. ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसानगैरप्रकारामुळे ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नव्याने गाळे वाटप करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी, अशी मागणी खैरनार यांनी केली आहे.

Web Title: Aandane gram panchayat bogus beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.