जिल्हा दारूमुक्तीसाठी ‘आप’ची निदर्शने
By admin | Published: January 1, 2016 12:20 AM2016-01-01T00:20:42+5:302016-01-01T00:24:27+5:30
जिल्हा दारूमुक्तीसाठी ‘आप’ची निदर्शने
नाशिक : व्यसनांमुळे युवा पिढी उद्ध्वस्त होत असल्याने नाशिक जिल्हा दारूमुक्त करावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नियमित हॉटेल्सला रात्री अकरा वाजेपर्यंत व्यवसायाची परवानगी असताना बियर बार मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देऊन शासनच व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दारूसारख्या व्यसनामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त असून दारू दुकाने बंद करण्यासाठी अनेक गावांमध्ये ठराव करून उपयोग झालेला नाही. जिल्ह्यात दारूचे प्रमाण वाढत असून त्यातून शातंता बाधीत होण्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा दारूमुक्त करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचे थकीत कर्ज मार्फ करावे, शेतमालावर आधारित हमी भाव द्यावा, शेतमालाची वाहतूक करणाऱ्यांना टोलमाफी द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात अॅड. प्रभाकर वायचळे, विनायक येवले, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, नकुल बोराडे, राजेश तिडके यांच्यासह अन्य कार्यकर्र्ते सहभागी झाले होते.