आधी आरती आणि पुष्पहार; नंतर करू आंदोलन जोडेमारो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:21+5:302021-09-16T04:20:21+5:30
नाशिकरोड : रस्त्यावरील खड्डयांमुळे आठ दिवसात सहा जणांना जीव गमवावा लागला असताना रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ...
नाशिकरोड : रस्त्यावरील खड्डयांमुळे आठ दिवसात सहा जणांना जीव गमवावा लागला असताना रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांची चक्क आरती करून पुष्पहार अर्पण केला. आता तरी जनतेच्या हाकेला धावून यावे, असे साकडे यावेळी घालण्यात आले. मात्र, जाता जाता आठ दिवसात सुधारणा झाली नाही तर जोडेमारो आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला. नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठ दिवसांत झालेल्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. नाशिक सिन्नर टोलवेज कंपनीच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीचे अधिकारी दीपक वैद्य यांना पुष्पहार घालून आरती करून गांधीगिरी पद्धतीने निषेध करण्यात आला.
नाशिकरोड - सिन्नर फाटा ते चेहेडीपर्यंत रस्त्याचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण करून चेहेडी दारणा पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते सुरु करण्याची मागणी करण्यात आली. खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाल्याने मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात पळसेगावच्या निष्पाप हेमंत कुमावतचा दुर्दैवी मुत्यू झाला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
नाशिक सिन्नर टोलवेज कंपनीच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्त्वाखाली कंपनीचे व्यवस्थापक दीपक वैद्य यांना हार घालून आरती केली, अशा प्रकारे गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन केले. स्थानिक कामगारांवरील अन्याय दूर करावा, पंचक्रोशीतील वाहनधारकांना टोल फ्री करावा, रस्त्याची दुरवस्था थांबवावी, सिन्नर फाटा ते चेहेडी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, तोपर्यंत संपूर्ण टोल वसुली बंद ठेवावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास जोडेमारो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्ष निखिल भागवत, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष संदेश टिळे, अनिल गायधनी, मनोज गायधनी, सुरज ठोंबरे, भगवान गायधनी, राजू टिळे, वैभव झाडे, रुपेश गायधनी, विक्रम गायखे, शंकर सरोदे, सोनू ठोंबरे आदी सहभागी झाले होते.
150921\15nsk_60_15092021_13.jpg
फोटो कॅप्शन शिंदे टोल नाका येथे कंपनीच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ अधिकारी दीपक वैद्य यांची आरती करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गणेश गायधनी, संदेश टिळे, मनोज गायधनी, निखिल भागवत आदी.