तिसगावच्या सरपंचपदी अहेर
By admin | Published: August 29, 2016 11:58 PM2016-08-29T23:58:36+5:302016-08-30T00:31:14+5:30
तिसगावच्या सरपंचपदी अहेर
उमराणे : तिसगाव (ता. देवळा)च्या सरपंचपदी ज्येष्ठ सदस्य दत्तू अहेर यांची बिनविरोध निवड झाली. सलग पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या दत्तू अहेरांना अखेर सरपंचपदाचा बहुमान मिळाला आहे.
येथील सरपंच पद हे आवर्तन पद्धतीनुसार असल्याने सरपंच देवानंद वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी बी. जी. आहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली.
सरपंचपदासाठी दत्तू अहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अहिरराव यांनी दत्तू अहेर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
अकरा सदस्यीय ग्रामपंचायतीत सलग पंधरा वर्षांपासून दत्तू अहेर हे सदस्य म्हणून निवडून येत आहेत. याआधी त्यांनी तीन वेळा उपसरपंचपद भूषविले आहे. यावेळी सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्याने ज्येष्ठतेनुसार त्यांना सरपंचपदाचा बहुमान देण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच देवानंद वाघ, माणिक जाधव, बाबाजी जाधव, राजू जाधव, उपेंद्र अहेर, गोकुळ अहेर, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहेर, योगेश अहेर, किशोर गायकवाड, रवींद्र अहेर, महेंद्र अहेर, अनिल अहेर, बाळासाहेब अहेर, हिरामण पवार, बी. के. अहेर, माधव अहेर, गणेश अहेर, बारकू देवरे, भाऊसाहेब पवार आदिंसह ग्रामविकास अधिकारी एम. एच. चव्हाण, तलाठी एम. एस. अहिरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)