संस्थेसाठी त्याग करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:43 PM2020-01-15T22:43:54+5:302020-01-16T00:33:17+5:30
कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.
निफाड : कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.
कुंदेवाडी, ता. निफाड येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्र मात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, सुरेशबाबा पाटील, रायभान काळे, सचिन पिंगळे, राघो आहिरे, भाऊसाहेब खताळे, प्रशांत देवरे, विश्राम निकम, विश्वास मोरे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डी. डी. काजळे, एस. के. शिंदे, शिवाजी भालेराव, मुख्याध्यापक एम.टी. पाटील आदी मान्यवर होते.
यावेळी विनायकदादा पाटील यांनी १९५२ साली कुंदेवाडी येथून कोलंबोला कांदा एक्स्पोर्ट होत असल्याची माहिती दिली.
कृषी संशोधन केंद्र, वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, माध्यमिक शाळा अशा अनेक मोठ्या संस्था गावात उभ्या राहिल्या त्यात या गावच्या लोकांचा त्याग असल्याची आठवण करून देत ज्या ठिकाणी बोट क्लब सुरू होतोय तिथे पूर्वी डोह होता आणि त्यात मगरी असल्याची जुनी माहिती दिली. यावेळी शाळेने सुवर्णमहोत्सवा-निमित्त काढलेल्या स्वामी या स्मरणिकेचे प्रकाशन व कादवा नदीतील बोट क्लबच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. स्वागताध्यक्ष संचालक प्रल्हाद गडाख यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते तसेच नंदू गायकवाड, रावसाहेब घेगडे, सीमा पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच विनोद मोरे, वैकुंठ पाटील, कांतिलाल अलिझाड, सुनील शिंदे, अभय बलदोटा, अशोक शिंदे, माधव गिते, संदीप शिंदे, योगेश शिंदे, सुनील घेगडे, प्रभाकर वाघ, शिवाजी ढेपले, अविनाश पवार, जानकीराम धारराव यांच्यासह माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून या मेळाव्याची तयारी सुरू होती. गेल्या ५० वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात एकमेकांना अनेक वर्षांनी भेटलेले मित्रमैत्रिणी गप्पामध्ये रंगले होते. या कार्यक्र मानिमित्ताने आलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला देणगी म्हणून एका दिवसात ९८ हजार रु पये जमा झाले.